Sunday, July 30, 2023
Thursday, July 13, 2023
Exploring the Use of ChatGPT in Education: Unveiling Potential Issues
Title: Exploring the Use of ChatGPT in Education: Unveiling Potential Issues
Introduction
In recent years, the field of education has witnessed the integration of various technological advancements aimed at enhancing the learning experience. One such innovation is the use of chatbots powered by advanced natural language processing models like ChatGPT. These chatbots offer personalized and interactive support to students, providing immediate responses to their queries. While the utilization of ChatGPT in education shows promise, it is crucial to acknowledge and address the potential issues that may arise. This article delves into the benefits of using ChatGPT in education while also shedding light on the challenges it can create.
Benefits of ChatGPT in Education
Personalized Learning Experience: ChatGPT provides students with a personalized learning experience by offering real-time responses tailored to their specific needs. It can adapt to individual learning styles and pace, catering to students' diverse requirements.
Immediate Feedback: With ChatGPT, students receive instant feedback on their questions or assignments. This immediate response can foster engagement and motivation, as it allows for rapid problem-solving and continuous learning.
24/7 Accessibility: ChatGPT is available round the clock, providing students with on-demand support beyond regular school hours. This accessibility ensures that students can seek assistance whenever they need it, promoting a sense of independence and self-directed learning.
Resource for Teachers: ChatGPT can also serve as a valuable resource for teachers, helping them manage large class sizes and individual student inquiries. By automating routine queries, teachers can allocate more time to address complex issues and facilitate deeper discussions in the classroom.
Potential Issues and Challenges
Lack of Emotional Intelligence: While ChatGPT can deliver accurate responses based on the available data, it lacks the emotional intelligence and empathy that human teachers possess. This emotional connection plays a crucial role in building trust and rapport, which may be challenging to replicate with an AI-based chatbot.
Limitations in Critical Thinking: ChatGPT primarily relies on pre-existing data and patterns to generate responses. It may struggle to engage in critical thinking, creative problem-solving, or deeper analysis that human teachers can provide. This limitation can hinder students' development of higher-order thinking skills.
Language and Cultural Biases: ChatGPT's responses are shaped by the data it is trained on, which can inadvertently contain biases. These biases may reflect societal, cultural, or linguistic prejudices, leading to potentially inaccurate or discriminatory responses. Safeguarding against such biases is crucial to ensure fair and inclusive education.
Overreliance and Reduced Human Interaction: Excessive dependence on ChatGPT may diminish opportunities for face-to-face interactions among students and teachers. Human interaction fosters social and emotional skills, collaborative learning, and the development of interpersonal relationships, which are essential for holistic education.
Addressing the Challenges
Augmentation, Not Replacement: Educators should view ChatGPT as a tool to enhance the learning experience, not as a complete replacement for human instruction. Maintaining a balanced approach between technology and human interaction can help address the limitations of AI-based systems.
Regular Evaluation and Monitoring: Educational institutions and policymakers should continuously evaluate and monitor the performance and impact of ChatGPT in educational settings. This includes reviewing the quality of responses, identifying biases, and updating the training data to ensure fairness and inclusivity.
Ethics and Responsible AI Use: Developers and educators must prioritize ethical considerations when designing and implementing AI-powered systems. Establishing clear guidelines for data collection, training, and response generation can help mitigate biases and promote responsible AI use in education.
Comprehensive Teacher Training: To maximize the benefits of ChatGPT, teachers should receive adequate training on effectively integrating AI chatbots into their classrooms. This training should emphasize strategies to utilize ChatGPT as a complementary tool and focus on fostering critical thinking and emotional intelligence skills.
Conclusion
The integration of ChatGPT and similar AI technologies in education offers exciting possibilities for personalized learning and immediate support. However, it is essential to address the potential challenges associated with their use. By being aware of the limitations and actively working to mitigate them, educators can harness the power of AI while maintaining the essential elements of human connection, critical thinking, and inclusivity in education.
Wednesday, July 12, 2023
इन्फोटेक - Book Review
कॅनव्हास ते वॉल - Book Review
भीमसेन - Book Review
श्याम - भागवताचं सचित्र पुनर्कथन. - Book Review
एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश
*आठवडा क्र. १४०८*
*पुस्तक क्र १०३३*
*सत्र : २, पुस्तक: ४*
*पुस्तकाचे नाव – श्याम - भागवताचं सचित्र पुनर्कथन*
भाषा- मराठी
*लेखक : देवदत्त पटनायक ,अनुवाद इंद्रायणी चव्हाण*
किमत:३५६ रुपये
पृष्ठसंख्या : ३०७
*परिचय कर्ता : सचिन केळकर*
लहानपणीपासूनच मला पुराणातील गोष्टी वाचायला आवडतात .याची आवड अमर चित्रकथांपासून सुरू झाली .महाभारत ,रामायण, इतिहास अशा अनेक विषयांवरच्या
अमर चित्रकथा वाचत आपण लहानाचे मोठे झालो .गेल्या काही वर्षात पुराणातील गोष्टी वाचण्याकरता देवदत्त पटनायक या लेखकांची अनेक पुस्तके उपलब्ध झाली आहेत .पुराणातील गोष्टी, नवीन संदर्भांनी आणि त्यांचे मिथक अजून स्पष्ट करण्याकरता देवदत्त पटनायक यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत त्यातील एक पुस्तक म्हणजे *श्याम - भागवताचं सचित्र पुनर्कथन *..
देवदत्त पटनायक हे आधुनिक काळात पुराणांचे संदर्भ स्पष्ट करणारे लेखन, रेखाचित्रण आणि व्याख्याने या माध्यमातून आपल्यासमोर येत असतात .१९९६ पासून आतापर्यंत त्यांनी ५० पुस्तके आणि एक हजार लेख दिले आहेत त्यामध्ये विविध कथा मधून ,प्रतिकांमधून आणि कर्मकांडांतून जगभरातील प्राचीन आणि आधुनिक संस्कृतीमध्ये काल्पनिक सत्य किंवा मिथक कशाप्रकारे अस्तित्वात आणली जातात हे स्पष्ट केलं गेलं आहे. .
पटनायक यांची पुस्तके / व्याख्याने खूपच रंजक असतात .काही लोकांना त्यांची लेखन शैली आवडते ,काही लोकांना आवडत नाही पण त्यांचा पौराणिक गोष्टींचा अभ्यास आणि त्यांचे विवेचन हे नक्कीच मोहून टाकते.
त्यांच्या अनेक पुस्तकांपैकी आज एक पुस्तक मी निवडलं आहे त्याचं नाव म्हणजे *श्याम - भागवताचं सचित्र पुनर्कथन* .. कृष्ण या व्यक्तिमत्वाने मला नेहमीच भुरळ घातली आहे . श्रीकृष्ण अर्थात श्याम हे व्यक्तिमत्व किती प्रयत्न केला तरी समजून घेताना थोडंसं गूढ (complex) वाटतं . कृष्ण हा योगी आहे ,शांततेसाठी प्रयत्नशील असा योद्धा आहे, प्रेम आणि कर्तव्य यात संतुलन साधणारा कर्तव्यदक्ष प्रेमी आहे श्रीकृष्णाचं हे बहुआयामी आणि काहीच गूढ व्यक्तिमत्व देवदत्त पटनायक यांनी त्यांच्या श्याम या लडिवाळ नावानं अतिशय सुंदर रीतीनं उलगडून दाखवलं आहे. त्यांच्या ओघवत्या भाषाशैलीचा तसाच ओघवता आणि सुरेख अनुवाद करण्याचं समर्थ काम अनुवादक इंद्रायणी चव्हाण यांनी केलं आहे.
कृष्ण कोण होता आणि तो कसा दिसत होता हे कृष्णाचा पणतू म्हणजे राजा वज्रनाभाने विराट कन्या उत्तरेला विचारले. कृष्णाचे स्मरण होतात उत्तरेच्या नजरेसमोर एक रूप साकार झालं-“ त्याचे अरुंद खांदे ,रुंद नितंब ,त्याचे रेखीव अवयव, कुरळे केस ,काळा सावळा वर्ण ,प्रेमळ नेत्र ,आश्वासक आविर्भाव आणि चेहऱ्यावर सतत विलसत असणारे ते खट्याळ हसू.” कृष्णाचा नखशिखांत वर्णन केल्यानंतर उत्तरा म्हणाली “त्याच्यावर प्रेम करणारे सारेजण त्याला श्याम म्हणत असत “
कृष्णाचं वर्णन करताना हे रेखाटलेलं शब्दचित्र इतकं प्रभावी होतं की वज्रनाभाने कृष्णाचे मोहक रूप मूर्ती स्वरूपात उतरवायचा प्रयत्न केला. उत्तम उत्तम कलाकार त्याने पाचारण केले पण ते लोकोत्तर सौंदर्य आणि मोहकता एकाही कलाकाराला आपल्या कलाकृतीत मधून पूर्णतः साकारता आली नाही . कालांतराने या मूर्ती भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात गेल्या आणि त्या मूर्तींना वेगवेगळी नावे दिली गेली. केरळमधील बालकरुपी कृष्ण, उडुपी येथील ताक घुसळणारा कृष्ण , वृंदावनातील बासरी घेऊन कृष्ण , नाथाद्वारातील गोवर्धन पर्वत उचलणारे श्रीनाथजी आणि चेन्नईतल्या पार्थसारथी या कृष्ण प्रतिमेला तर चक्क मिशा आहेत.
कृष्णाची ही विविध रूपे देवदत्त पटनायक यांनी या पुस्तकात सुमारे १६ भागात वर्णन केली आहेत. त्यामध्ये कृष्णजन्मापासून कृष्णाच्या लहानपणच्या बालकथा ते तरुण कृष्ण आणि त्यानंतरचा प्रौढ कृष्ण असा प्रवास या १६ भागात व्यक्त केला आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या पानापासून, श्रीकृष्ण भागवत पुराणातील येणाऱ्या संदर्भांबद्दल श्री पटनायक यांनी स्वतः रेखाटलेली अनेक चित्रे. प्रत्येक कथेला उठाव देणारी ही चित्रे ,त्यांची शैली हेही आपल्याला त्या काळात घेऊन जाते.
या पुस्तकात जागोजागी कृष्ण गोष्टींसोबत त्या त्या घटनेचा आढावा घेणाऱ्या काही टिपा तसेच त्या घटनेच्या संदर्भात चालत आलेल्या काही प्रथा आणि कल्पना यांचेही वर्णन दिले गेले आहे. त्यामुळे आपल्याला माहिती असलेली गोष्ट एका वेगळ्याच विचारातून वाचायला खूप आवडते.
पहिला भाग नवजात बालक शाम- यात यादवांचा कुलवृत्तांत,कंस आणि जरासंध यांचा जन्म कसा झाला ,देवकी , वसुदेव आणि बलराम आणि त्यानंतर झालेला कृष्णजन्म याचे वर्णन आहे. श्रीकृष्ण जन्माबरोबरच यशोदेची कन्या जिला मारायचा प्रयत्न कंसाने केला .ती त्याच्या हातातून निसटली आणि विशाल रूप धारण करत आकाशाला जाऊन भिडली आणि प्रत्येक हातात लखलखत शस्त्र असलेल्या अष्टभुजा शक्ती मध्ये रूपांतर झालं . या योग मायेचा अनेक ठिकाणी येणारा संदर्भ नक्कीच वाचण्यासारखा आहे.
पुढील काही भागात कृष्णाच्या बालपणच्या अनेक माहिती त्या गोष्टी आपल्यासमोर येतात .कृष्णा आणि बलराम यांचे खेळ ,पूतना राक्षसिणीची गोष्ट , यशोदा आणि कृष्ण यांचे लहानपणचे खेळ अशा अनेक गोष्टी पुढच्या भागात आपल्याला वाचायला मिळतात . जेव्हा यशोदा परसातील बागेतील माती उकरून खाणाऱ्या शामला तोंड स्वच्छ करायला सांगू लागते तेव्हा श्याम तोंड उघडतो आणि यशोदेला त्याच्या तोंडात माती ऐवजी विश्वदर्शन होतं.
कृष्णानं आपल्या असीम रूपाचं दर्शन घडवण्याच्या कथा भागवतामध्ये अनेकदा आले आहेत .राम परशुराम किंवा अन्य कोणत्याही अवताराने किंवा अन्य ईश्वरानेही असं कधी केलं नव्हतं .कृष्णाने यशोदे सकट अक्रूर, धृतराष्ट्र आणि अखेरीस अर्जुनालाही आपल्या असीम रूपाचं दर्शन घडवलं होतं .
कृष्णाच्या बाळ लीलापासून त्याच्या खट्याळ स्वभावाच्या गोष्टीही या पुस्तकात आपल्यासमोर येतात .कृष्णाला माखन चोर आणि चित चोर म्हटलं जातं .ही चौर्य कर्म आनंद देतात. देवालाच चोर बनवण्याची ही कल्पना सर्व गोष्टी कुलूप बंद असलेल्या आपल्या मनाच्या भीती कडे लक्ष वेधते .कृष्ण आपल्याला आपलं हृदय द्वार आणि आपला खजिना उडायला सांगतो. कारण ,तो हृदय ही चोरतो आणि संपत्तीचे प्रतीक असलेलं लोणीही चोरतो. अशी या मागची भावना असावी.
गुराखी रुपी श्याम कथांमध्ये अनेक रूपके आहेत .गायींचा सांभाळ करणे आणि गुराखी म्हणून सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर केलेल्या खेळांचं यात वर्णन आहे. तसेच गाई राखताना अनेक संकटांशी समर्थ शाम करणारा श्याम हा त्याच्या सवंगड्यांमध्ये नेहमीच शाबासकी मिळवता दाखवला गेला आहे. या बाल क्रीडांचा संबंध कृष्णाच्या सामाजिक स्तरांच्या संदर्भात येतो. वसुदेव आणि कृष्ण हे दोघं कधीही राजा म्हणून दिसले नाहीत .कृष्णाला नेहमीच गुराखी आणि सारथी मानला गेला आहे. कृष्ण बलराम यांच्या परस्पर पूरक नात्याचाही या गुराखी श्याम गोष्टींमध्ये अनेक ठिकाणी उल्लेख येतो.
कृष्ण आणि गोकुळातील गोपिकांचं नेहमीच एक वेगळं नातं राहिलं आहे. यातूनच प्रियकर शाम हे रूप उभे राहिले आहे . प्रत्येक गोपिकेसाठी कृष्णाला वेगळे रूप घेण्याची कल्पना भागवत पुराणात दिसून येते . द्वारकेला गेल्यानंतरही कृष्ण त्याच्या सोळा हजार एकशे राण्यांना संतुष्ट करण्यासाठी स्वतः अनेक रूपे धारण करतो .या कथातून कृष्णाचं देवत्व सिद्ध होतं. प्रियकर शाम या रूपात सगळ्यात प्रसिद्ध कथा ती श्याम आणि राधेची. राधा ही वृषभानू आणि वीर बाली यांची कन्या होती. वृंदावना जवळच असलेलं बरसना हे तिचं गाव होतं . आज आपल्याला माहिती असलेली राधा ही बाराव्या शतकात जयदेवाने रचलेल्या गीत गोविंद या संस्कृत काव्यातली आहे. गीत गोविंदा मध्ये कृष्ण केवळ राधेचा आहे आणि अन्य साऱ्या गोपिका या दोघांच्या सहाय्यक रसिका किंवा दासी आहेत असे दाखवले गेले आहे. या रूपात कृष्ण हा शृंगार मूर्ती अर्थात प्रेमरूपात आणि राधा ही रसेश्वरी अर्थात सौंदर्य मूर्तीच्या रूपात पुढे येते.
कृष्ण मथुरेला निघाल्यानंतर त्याला अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गवळणी आणि त्याच्या प्रेमाने कष्टी झालेली राधा यांची कथा या अध्यायात येते. आपली आठवण म्हणून राधेला बासरी ठेवून निघून जाणारा श्याम आपल्याला दिसतो .साधारणपणे कृष्णाच्या हाती कायम बासरी दाखवली जाते पण खरंतर राधे विना आणि गवळणी विना असलेल्या कृष्णाच्या हाती कधीही बासरी दिसली नव्हती.
या पुढील भाग कृष्णाचा आणि बलरामाचा मथुरेतील अध्याय आहे .मथुरेत जाऊन कृष्ण बलराम यांनी केलेल्या अनेक शक्ती स्पर्धा, धनुष्यभंग आणि कुस्तीच्या आखाड्यात केलेला कंस वध या भागात आपल्यासमोर येतो .याबरोबरच कृष्णाचा गुराख्यांच्या गावातला बालपणाचा काळ संपतो आणि नगरातल्या राजांबरोबरचा प्रौढपणाचा आरंभ होतो .भक्ती साहित्यामध्ये कृष्णाची मल्ल प्रतिमा फारशी लोकप्रिय नाही .त्याच्या गोपाल आणि मुरलीधर याच प्रतिमाना प्राधान्य आहे. भक्ती पंथापूर्वीची कृष्णाची प्रतिमा ही नायक (वीर रस )आणि आक्रमक (रुद्र रस ) अशी आहे तर भक्ती पंथामध्ये कृष्णाची प्रतिमा मित्र (सखा ) ,वैषयिक भावना जागृत करणारा (शृंगार भाव), प्रियकर (प्रेमभाव) आणि माता-पिता (वात्सल्य भाव) अशी आहे .
पुढच्या भागात श्याम आणि बलराम यांची विद्यार्थी दशा, त्यांनी केलेली सांदीपनी ऋषींकडून त्यांनी केलेली ज्ञानप्राप्ती आणि पांचजन्य यज्ञ करून गुरूला केलेले वंदन यांचा समावेश आहे .यानंतर जरासंधाने मथुरेवर केलेले हल्ले आणि सर्वात शेवटी श्रीकृष्णाने घेतलेली माघार यांचा उल्लेख आहे . जरासंधाच्या सैन्यापासून यादवांना वाचवण्याकरता कृष्णाने मथुरेतून द्वारकेला स्थलांतर केले आणि द्वारावती किंवा द्वारकेची निर्मिती केली .रणभूमीतून पळ काढणाऱ्या कृष्णाला रणछोडदास म्हणजे रण सोडणारा असे संबोधले गेले आहे. कृष्णाचे रूप गुजरात मध्ये डाकोर आणि द्वारके मध्ये पूजनीय आहे. भविष्यात युद्धासाठी तयार राहण्याकरता एखाद्या युद्धातून माघार घेण्याला कृष्णाला कमीपणा वाटला नाही.
अनेक नात्यातील कृष्णाची रूपे आपल्याला मोहून टाकतात. रुक्मिणीचा पती म्हणून कृष्ण ,एक गृहस्थ म्हणून सुदाम्याशी प्रेमाने वागणारा कृष्ण ,सत्यभामा आणि रुक्मिणी बरोबर ती पारिजातकाची वाटणी करून घेणारा कृष्ण अशा अनेक कथा परत वाचायला खूप छान वाटतात. नरकासुराच्या वधा नंतर त्यांनी देशोदेशीतून पळवून आणलेल्या १६१०० स्त्रियांना दिलेले भार्या म्हणून स्थान कृष्णाचं एक अनोख रूप आपल्याला दाखवून जाते . बंधू म्हणून पांडवांच्या बद्दल नातं नेहमीच आपल्यासमोर महाभारतातून वेगवेगळ्या स्वरूपात येत गेलं आहे. अर्जुन आणि कृष्णामध्ये एक विशेष नातं होतं .ते दोघं म्हणजे नर आणि नारायणाचे रूप होते .
कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील मैत्रीचं नातं ही विशेष आहे . राधेप्रमाणे द्रौपदी त्याची प्रेयसी नव्हती .रुक्मिणी आणि सत्यभामेप्रमाणे ती त्याची पत्नीही नव्हती सुभद्रेप्रमाणे ती त्याची बहीण नव्हती .ती होती फक्त श्याम सखी.
पुस्तकाच्या शेवटच्या भागात सारथी श्याम म्हणजेच कृष्णाने महाभारतामध्ये केलेले पांडवांचे सहकार्य आणि कौरव पांडवांच्या भांडणामध्ये केलेली मध्यस्थी आहे.महाभारताचे हे पर्व बहुतेक आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे तसा मी जास्त उल्लेख करत नाही तरीसुद्धा या महायुद्धाच्या मधल्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा आपल्याला माहित नसलेली प्रतीके या पुस्तकात खूप छान पणे दिलेली आहेत.
अर्जुनाला केलेले विश्वरूप दर्शन या भागात खूप छानपणे विशद केले आहे. गीता म्हणजे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कृष्ण आणि अर्जुनात झालेला संवाद .महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा श्याम द्वारावतीला परत जायला निघणार तेवढ्यात अर्जुन त्याला भेटला आणि म्हणाला “युद्धाला आरंभ होण्यापूर्वी तू मला जे जीवनात सत्य सांगणार सर्वोच्च ज्ञान दिल होतच पण तू सांगितलेलं सगळच काही माझ्या स्मरणात राहिले नाही कृपा करून ते तू सर्व पुन्हा सांगशील का?” हे ऐकून श्याम क्रोधित झाला पण त्याला हेही जाणवलं की अर्जुन गंभीरतेने ज्ञान मागतो आहे त्यामुळे ही विनंती त्याने मान्य केली आणि परत एकदा हे ज्ञान दान केलं गेलं त्यात पूर्वीपेक्षा जास्त अध्याय होते ,जास्त रूपके होती .अशा प्रकारे अनु गीता सांगितल्यावर श्याम द्वारावतीला परत गेला.
शेवटच्या भागामध्ये प्रौढ श्याम म्हणून कृष्णाचे वर्णन आहे , क्षुल्लक वादविवादामुळे यादव यादवांमध्ये झालेले युद्ध आणि त्यातून यादव वंशाचा अंत, बलरामाचा देह त्याग आणि कृष्णाची जर नावाच्या आदिवासी शिकार यांनी केलेली हत्या या भागात आहे . कृष्णाचा मृत्यू हा कलियुगाच्या आरंभाचा संकेत आहे असे मानले जाते .
कृष्ण एक गुराखी ,सारथी ,योद्धा उपदेशक आणि संन्यासी म्हणून जगला म्हणूनच तो पूर्ण अवतार मानला गेला .आपण परिपूर्ण आणि स्वयंभू आहोत हे माहिती असूनही त्यांनी वात्सल्य, माधुर्य, शृंगार या मानवी भावभावनांचा आनंद घेतला.. त्याला कशाचीही अपेक्षा नव्हती तरीही तो घेण्यासाठी देत राहिला आणि जे घेतलं त्याच्यापासून अलिप्त राहिला. हे कृष्णाचे रूप वाचण्याकरता करण्याकरता भागवत कथा वाचणे अतिशय गरजेचे आहे.
भागवत कथा अनेक पुस्तकी रूपात उपलब्ध आहेत पण एक सचित्र पुनर्कथन म्हणून देवदत्त पटनायकांचे हे पुस्तक मला वाचायला खूप आवडलं. या पुस्तकात देवदत्त पट्टनायकांनी श्रीकृष्णाचं बहुआयामी आणि काहीसं गूढ व अतिशय सुंदर रीतीनं उलगडून दाखवलं आहे. या पुस्तकात कृष्णाच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत, आनंदी स्त्रियांच्या सहवासातल्या दह्यादुधाच्या सुंदर जगापासून ते रक्तलांछित संतापी पुरुषांच्या क्रूर जगापर्यंत चढत जाणार्या कृष्णकथांची घट्ट वीण आहे. पुस्तकाचा अनुवाद ही तेवढाच रसाळ आणि सरल आहे.
धन्यवाद. परिचय कसा वाटला, जरुर कळवा
*सचिन केळकर ९८३३५६१४२१*
हंट फॉर द रेड ऑक्टोबर - Book Review
एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश
*आठवडा क्र. १४८*
*पुस्तक क्र १०३४*
*सत्र : २, पुस्तक: ५*
*पुस्तकाचे नाव – हंट फॉर द रेड ऑक्टोबर*
*भाषा : English*
*लेखक : टॉम क्लॅन्सी (He/Him)*
किमत: 286 रुपये
पृष्ठसंख्या : 480
*परिचय कर्ता : सचिन केळकर*
आज मी ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहे *हंट फॉर द रेड ऑक्टोबर*. टॉम क्लॅन्सी हे नाव आपण सर्वांनी ऐकले असावे . मिलिटरी टेक्नो थ्रिलर आणि हेरगिरीवरची जाडजूड पुस्तके देण्यात त्यांचा हात कुणी धरणार नाही . आतापर्यंत त्यांची तीस एक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत .माझ्या माहितीत तरी टॉम क्लॅन्सी यांच्या कोणत्याच पुस्तकांचा मराठीत अनुवाद झालेला नाही. त्यांच्या या अफाट निर्मितीमधलं पहिलं रत्न म्हणजे हंट फॉर द रेड ऑक्टोबर .या नावाचा चित्रपट ही काही वर्षांपूर्वी येऊन गेला .त्यात सर शॉन कॉनेरी, अलेक बाल्डविन यांनी भूमिका केल्या होत्या . सीआयए ,केजीबी ,अमेरिका, रशिया या चार गोष्टी म्हटल्या की आपल्यासमोर अनेक चित्त थरारक गोष्टी उभ्या राहतात .याच चार गोष्टींची सांगड घालत हंट फॉर द रेड ऑक्टोबर या कादंबरीची निर्मिती झाली आहे . या पुस्तकाच्या सुमारे ४३ लाख प्रती विकल्या गेल्या .यावरून या पुस्तकाची लोकप्रियता दिसून येते.
अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धामध्ये संबंध अतिशय गुंतागुंतीचे होते. यामध्ये सीआयए आणि केजीबी यांनी एकमेकांवरती केलेल्या कुरघोडींवरती अनेक पुस्तके आणि चित्रपट लिहिले गेले आहेत . त्यापैकीच हे एक पुस्तक . थोडेफार अमेरिका धार्जिण्या style ने लिहिले गेलेले हे पुस्तक सीआय आणि अमेरिकन नौदलाच्या आतील घडामोडींचा छान वेध घेते.
*जॅक रायन* हा टॉम क्लॅन्सी यांचा मानसपुत्र. शीतयुद्धाच्या सुमारास आखण्यात आलेली ही कथा. सीआयए ऍनॅलिस्ट जॅक रायन या कथेचा नायक आहे तसेच रशियाच्या आण्विक पाणबुडीचा कप्तान *मार्को रामीअस* या कथेचा दुसरा नायक आहे.
मार्को रामीअस हा सोवियत नौदलाचा सगळ्यात अनुभवी पाणबुडी कप्तान होता . त्याच्या पाणबुडी युद्धाच्या रणनीती नौदलांच्या शिक्षणामध्ये विख्यात होत्या. रशियाने बनवलेल्या टायफून प्रकारच्या नव्या आण्विक पाणबुडीमध्ये एक नविन प्रकारची इंजिन प्रणाली विकसित केली असते. पाणबुडीला शोधायला पाण्याखाली सोनार ( SONAR ) नावाचे तंत्रद्यान वापरतात. या कॅटरपिलर नावाच्या प्रणालीमुळे पाणबुडीच्या इंजिनचा आवाज अतिशय कमी होऊन , तो SONAR वर हुडकणे एकदम अवघड होते. रेड ऑक्टोबर या पाणबुडीत पहिल्यांदा कॅटरपिलर लावल्या असल्याने त्याची सागरी चाचणी घ्यायची कामगिरी मार्को कडे असते.
रेड ऑक्टोबर या नव्या पाणबुडीत हे तंत्रज्ञान वापरले असावे असं CIA ला अंदाज असतो. त्यामुळे या पाणबुडीचा मागोवा घेण्याचे काम जॅक रायन कडे असते. जॅक रायन या पाणबुडीच्या काढलेल्या फोटो वरून या पाणबुडीत काही तरी वेगळे आहे याचा कयास बांधतो. आणि नौदलाच्या खास प्रयोगशाळे मार्फत , या पाणबुडीची acoustic signature ( पाणबुडीचा पाण्यातील आवाज कसा असेल ) याचं एक मॉडेल तयार करतो.
मार्को वर सोपवलेली कामगिरी सोपी वाटली तरी त्याच्या मनात एक वेगळाच प्लॅन घडत असतो त्याच्या पत्नीचा मृत्यू हा रशियन सरकारच्या कारभारातील दिरंगाईमुळे झाला असा त्याचा समज झालेला असतो. त्यामुळेच रशिया सोडून अमेरिकेला डिफेक्ट व्हायचा त्याने विचार केलेला असतो आणि ते करताना जर आपण नवीन कोरी पाणबुडी घेऊन गेलो तर आपल्याला Asylum ( आश्रय) लगेच मिळेल असा त्याचा विश्वास असतो. त्याने आखलेल्या या मोहिमेची माहिती फक्त त्याच्या काही सीनियर ऑफिसरना असते.
रशियातून निघून बेरेन्ट सी , ग्रीनलँड मार्गे नॉर्थ अटलांटिक महासागरात अमेरिकेला पोहोचायचा त्याचा प्लान असतो. एकीकडे जॅक रायन आणि सीआयए रामीअसच्या पाणबुडीच्या हालचाली ट्रॅक करत असताना जेव्हा मार्को रेमियस आपले डिफेक्ट व्हायचे प्लॅन उघडपणे रशियन एडमिरलला कळवतो . तेव्हापासून या कथेची गती एकदम वाढते .एकीकडे रशिया आपल्या सर्व आरमाराला रेड ऑक्टोबरला हुडकून बुडवण्याचे आदेश देते तर अमेरिकन नौदल अचानकपणे वाढलेल्या रशियन नौदलाच्या हालचाली बद्दल चिंता व्यक्त करते . इथून एक गुंतागुंतीची आरमारी मोहीम आणि त्या मागचं तापलेले राजकीय वातावरण यांचं एक जाळं तयार होतं.
या सगळ्या गोंधळात रामीअसचा नक्की उद्देश काय असावा याचे विश्लेषण करायचं काम जॅक कडे येते,आणि तो एक धक्कादायक शक्यता व्यक्त करतो की रामीअसला आपली पाणबुडी घेऊन अमेरिकेला डिफेक्ट व्हायचं असावे. या धक्कादायक निष्कर्षावर अमेरिकन नौदल आणि अमेरिकन अध्यक्ष यांच्यामध्ये चर्चा होते. शेवटी जॅकला रेड ऑक्टोबर ला हुडकून मार्को शी संपर्क करायची कामगिरी मिळते.
रेड ऑक्टोबर अटलांटिक समुद्राच्या ज्या भागात असावी याचा अंदाज घेतला जातो . त्याच भागात असणाऱ्या अमेरिकेच्या यूएसएन डलस या पाणबुडीला संपर्क केला जातो. जॅक ला या पाणबुडीवर पाठवले जाते . त्या पाणबुडीवर जॅक डॅलसच्या कॅप्टनला या घटनेबद्दल सांगतो . आता युएसएन डलस रेड ऑक्टोबर चा पाठलाग करू लागते . अतिशय चाणाक्ष सोनार (SONAR) ऑपरेटर जोन्स मुळे रेड ऑक्टोबर चा पत्ता लागतो. आणि उंदीर मांजराचा एक अनोखा खेळ सूरु होतो.
रामीयसच्या या निर्णयामुळे चवताळलेलं रशियन नौदल रामीयस चा पाठलाग करायची कामगिरी त्याचा पट्टशिष्य असलेल्या कॅप्टन तुपोलेव च्या दुसऱ्या पाणबुडीला ( V. K. Konvalev) देतात . एक रशियन पाणबुडी पळाली हे उघडपणे सांगणे शक्य नसल्यामुळे या पाणबुडीला अपघात झाला आहे असे रशियन नौदल भासवते . आणि त्या करता रशियन आरमाराची शोध मोहीम आहे असे अमेरिकेला सांगते. रेड ऑक्टोबर च्या काही ऑफिसर सोडले तर बाकीच्या क्रू ( इतर नौसैनिक) ला रामीयस च्या प्लॅन ची माहिती नसते. एके ठिकाणी रामीयस आपल्या पाणबुडी मध्ये अपघात झाल्याचे जाहीर करून पाणबुडी सोडायची तयारी करायला सांगतो . सर्व सामान्य क्रू ला लाईफ बोट मधून बाहेर काढून स्वतः मात्र पाणबुडी मध्ये शेवटपर्यंत राहणार आणि कोणत्याही परिस्थिती पाणबुडी शत्रूच्या हाती लागू देणार नाही असे दाखवत तो परत समुद्रात बुडी मारतो .
रेड ऑक्टोबर चा कानोसा घेणारी अमेरिकेची युएसएन डलस ही पाणबुडी आणि रेड ऑक्टोबरला बुडवण्याचा आदेश मिळालेली रशियाची दुसरी पाणबुडी ( V. K. Konvalev) असे तिहेरी पाणबुडी युद्ध उत्तर अटलांटिक महासागरात चालू होते. मुख्य पात्रांच्या रंगवलेल्या सशक्त व्यक्तिरेखा तसेच बाकीच्या पात्रांच्या बद्दलचे डिटेल्स आपल्याला प्रत्येक पान गुंगवून ठेवतात.
जॅक रायन मार्को रामीअस पर्यंत पोचू शकतो का ? त्याला त्याचा उद्देश कसा कळतो ? तुपोलेवची रशियन पाणबुडी रेड ऑक्टोबर ला गाठू शकते का ? आणि रेड ऑक्टोबरचे पुढे काय होते ? या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आपल्याला हे पुस्तक वाचलेच पाहिजे किंवा हा चित्रपट तरी बघायला हवा. हंट फॉर रेड ऑक्टोबर हा चित्रपट अमेझॉन प्राईम वर उपलब्ध आहे .
पुस्तक तसे गुंतागुंतीचे आणि पाणबुडीच्या बद्दल तांत्रिक गोष्टींनी भरपूर आहे पण टॉम क्लॅन्सी यांचे सैनिकी गोष्टींचे निरीक्षण आणि त्याबद्दल इत्यंभूत माहिती देऊन कथा बांधायची हातोटी या पुस्तकातून दिसते. टॉम क्लॅन्सी खिळवून ठेवणाऱ्या कथा लिहिण्यात माहीर आहेत. त्यांच्या कादंबरी मध्ये कल्पना विस्तार खूप डिटेल्स मध्ये असल्याने पृष्ठ संख्या जास्त असते , त्यामुळे त्यांची काही पुस्तके कंटाळवाणी वाटायची शक्यता आहे , पण ज्यांना युद्ध/ सैनिकी कथा आणि गुप्तचर कथा हे विषय आवडतात , त्यांनी टॉम क्लॅन्सी वाचणे वगळून चालणार नाही.
टॉम क्लॅन्सी यांची काही गाजलेली पुस्तके सिनेमा किंवा टेलिव्हिजन सिरीज मध्ये आलेली आहेत .त्यांची नावे खालील प्रमाणे
• Patriot Games
• Clear and Present Danger
• The Sum of All Fears
• Without Remorse
अजून काही गाजलेल्या कादंबऱ्यांची नावे
• Red Storm Rising
• The cardinal of the Kremlin
• Debt of Honor
• Executive Orders
• Rainbow Six
• The Bear and the Dragon
• The Teeth of the Tiger
• Dead or Alive
• Against All Enemies
• Locked on
• Command Authority
धन्यवाद. परिचय कसा वाटला, जरुर कळवा
*सचिन केळकर ९८३३५६१४२१*
महाराष्ट्र सारस्वत - Book Review
पुस्तकप्रेमी अभियानातील हे १०३१ वे पुस्तक
एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश
*आठवडा क्र. १४८*
*पुस्तक क्र १०३१**सत्र : २, पुस्तक: २*
*पुस्तकाचे नाव – महाराष्ट्र सारस्वत.*
*भाषा मराठी *
*लेखक : विनायक लक्ष्मण भावे, पुरवणी शं गो तुळपुळे*
पॉप्युलर प्रकाशन
किमत: 30 रुपये
पृष्ठसंख्या : 1076
*परिचय कर्ता : सचिन केळकर
आज मी ज्या ग्रंथाची ओळख करून देणार आहे त्या ग्रंथाचे नाव आहे महाराष्ट्र सारस्वत. मराठी भाषेतील वाङ्मयाच्या उत्क्रांतीचा इतिहास असे या ग्रंथाचे वर्णन करता येईल. मराठी वाङ्मयाच्या रचनेचे आतापर्यंत जे अनेक विविध प्रयत्न झाले त्यांचा आढावा या ग्रंथात केलेला आहे .
ग्रंथाचा आवाका खूप मोठा असल्यामुळे त्याचा परिचय करून देणे हे एक अतिशय कठीण काम आहे . या ग्रंथाचा परिचय लिहिणे हे मराठी भाषेचा सखोल अभ्यास असल्याशिवाय शक्य नाही त्यामुळे संपूर्ण परिचय न देता या ग्रंथाची थोडक्यात ओळख करून देणे एवढेच माझे काम आहे असे मानतो. या ग्रंथाचा आपल्यापैकी कोणाला अगदी तपशीलवार अभ्यास करायचा असेल तर हा ग्रंथ खालील लिंक वरती ऑनलाईन उपलब्ध आहे. भारत सरकारच्या दुर्मिळ पुस्तकांच्या सूचीमध्ये या ग्रंथाचा समावेश असून हा अंक त्याच्या पुरवणीसकट आपल्याला सहज वाचता येऊ शकतो
https://www.indianculture.gov.in/rarebooks/mahaaraasatara-saarasavata-pauravanaisaha
या ग्रंथामध्ये तात्कालीन मराठी भाषेचा इतिहास सुमारे तीन भागांमध्ये म्हणजेच बाल्यावस्था, युवावस्था आणि प्रौढावस्था असा विभागलेला आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक आवृत्ती बरोबर अनेक पुरवण्या आणि सूची नवीन आवृत्तीत वाढत गेल्या आणि मूळचा शंभर पानांचा निबंध , ६५ वर्षांनी अकराशे पानांचा ग्रंथराज झाला आहे .सारस्वताची पहिली आवृत्ती १८९८-९९ मध्ये प्रसिद्ध झालेला एक ९८ पानांचा निबंध होता. ती आवृत्ती विष्णू गोविंद विजापूरकर यांच्या ग्रंथमाला या मासिक पुस्तकात प्रसिद्ध झाला होता.
आता या ग्रंथाचा विस्तार बघूया. सुमारे ३२ प्रकरणांमध्ये हा ग्रंथराज मराठी वाङ्मयाची विस्तृत माहिती घेऊन येतो. पहिल्या चार प्रकरणांमध्ये मराठी भाषेची मूळ पीठिका ,ग्रंथ कर्तुत्वाची सुरुवात ,श्री चक्रधर आणि महानुभाव पंथ यांच्या काळात झालेल्या मराठी बद्दल विशेष टिप्पणी केलेली आहे. मराठी भाषा कुठून उत्पन्न झाली याविषयी वाचताना खूप मजा येते . मराठी भाषेतील अतिशय सुरुवातीचे शिलालेख ,काही कवने आणि ओव्या या ग्रंथामध्ये जागोजागी आपल्याला वाचायला मिळतात.
पुढच्या चार भागात ज्ञानेश्वर आणि त्यांची तीन भावंडे ,नामदेव तेराव्या शतकातील आणि चौदाव्या शतकातील काही ग्रंथकार यांच्या रचनांचा अभ्यास केला आहे.
महाराष्ट्रातील साधू संतांच्या अनेक परंपरांपैकी नाथ परंपरा ही फार प्रसिद्ध आहे. याचा उल्लेख श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानदेवी ग्रंथात केला आहे. आदिनाथ-मच्छिंद्रनाथ - गोरक्षनाथ – गहिनीनाथ - निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ उर्फ ज्ञानदेव अशी परंपरा आहे. भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी यांच्या निर्मितीची गोष्ट आपल्याला या ग्रंथात वाचायला मिळते .ज्ञानेश्वरांच्या दृष्टांत व उपमा देण्याची शैली बद्दल यात नमूद केले आहे याचा परिणाम म्हणजे वाचकाच्या मनात कवीच्या कल्पना पूर्णपणे बिंबून जातात.
*माझा मर्हाटाचि बोलू कौतुके | परी अमृता तेही पैजेसी जिंके |
ऐसीं अक्षरेंची रसिके| मेळवीन ।।*
ज्ञानेश्वरांच्या बरोबरच निवृत्तीनाथ यांनी लिहिलेला हरिपाठ ,सोपान देवांची पंचीकरण ,हरिपाठ वगैरे प्रकरणे आणि मुक्ताबाईंनी लिहिलेले अभंग ,पदे ,कल्याण पत्रिका आणि हरिपाठ या रचना प्रसिद्ध आहेत या सगळ्या भावंडांच्या व्यासंगाबद्दल आणि वाङ्मय निर्मिती बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
ज्ञानेश्वरांच्या पाठोपाठ संत नामदेव यांच्या वरतीही एक विस्तृत प्रकरण आहे नामदेवांच्या रचना, विठ्ठला बद्दल त्यांचे असलेले एक आगळे वेगळे नाते आणि त्यातून निर्माण झालेली अनेक पदे ,अभंग याचा सविस्तर मागोवा या ग्रंथात घेतला आहे . विठू माऊलीच्या ठिकाणी नितांत प्रेमभावना होणे हाच भागवत धर्म, हाच भक्तिमार्ग, हेच वारकरी पंथाचे रहस्य होय. हे रहस्य ज्ञानेश्वरांचा सहवासी महान भक्त नामदेव, त्याच्या ,त्याच्या कुटुंबाच्या आणि त्याच्या दासी जनीच्या आणि शिष्यमंडळे यांच्या चरित्रात उत्तम दिसत आले. याच्या पुढच्या प्रकरणात तेराव्या आणि चौदाव्या शतकातील काही ग्रंथकारांचा आढावा घेतलेला आहे .जसे विसोबा खेचर ,नरहरी सोनार, गोरा कुंभार ,चोखामेळा आणि इतर.
*तुझा विष्णुदास| म्हणताती जगी| परी नाही अंगी | प्रेमभावो ||
तेणे थोर लाज|वाटे पंढरीराया |ये माझ्या हृदया| एक वेळा||
द्वेषाद्वेष भाव| असे माझ्या ठाई| अनुभव तुझा नाही| प्रेम सुख||
देखोवेखी बैसे |संतांचे संगती| नाही माझे चित्ती| ध्यान तुझे||*
पुढचे प्रकरण एकनाथ महाराजांवर असून त्यांचे चरित्र, त्यांनी निर्मिती केलेले ग्रंथ आणि भागवतावरचे त्यांचे निरूपण याबद्दल माहिती दिली आहे भागवतासारख्या प्रसिद्ध ग्रंथा बरोबरच एकनाथांनी लिहिलेले रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे यात वर्णन आहे .ज्ञानेश्वरीच्या तीनशे वर्षानंतर केलेल्या जीर्णोद्धाराचा यात उल्लेख आहे .मराठी संतवाणी मध्ये एकनाथांनी केलेली भरीव कामगिरी या प्रकरणात नमूद केली आहे .त्यांच्या काव्यामध्ये काटेकोरपणा, व्यवहारिकपणा ,चातुर्य खोल अर्थ असे भाव आढळतात याचा उल्लेख इथे केलेला आहे.
*जें सकळ शास्त्रांचे सार| जें सकळ वेदांचे गहिवर|
जें सकळ पुराणांचे माहेर| ग्रंथासि आले||*
याच्या पुढची प्रकरणे एकनाथ पंचक ,एकनाथांच्या वेळचे इतर काही कवी, मुक्तेश्वर सोळाव्या शतकातील कवी यावर आहेत .त्यानंतरचे प्रकरण संत तुकारामांवरती आहे संत तुकारामांचे चरित्र ,त्यांचे अभंग आणि त्या मागची सामाजिक परिस्थिती त्याचे छान वर्णन या ग्रंथात आहे .तुकारामानी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले अभंग सुद्धा या पुस्तकात नमूद केले आहेत. आपल्या ज्ञानेश्वरी ,नामदेव, एकनाथी भागवत आणि रामायण यांच्या चौफेर अभ्यासाने तुकारामांनी सोप्या मराठीत केलेल्या अभंगांची निर्मिती केली आणि त्यांचे अभंग आजही अठरा पगड जातीच्या तोंडात कायमचे आहेत. मार्च महिन्यामध्ये संध्या ताईंनी तुकोबांच्या वरील एका छान पुस्तकाचाही परिचय करून दिला होता .
यापुढील प्रकरण समर्थ रामदासांवरती आहे .रामदासांचे अल्पचरित्र, त्यांनी लिहिलेले श्लोक आणि त्यांच्या विचारांची एक छान उजळणी या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळते. रामदास स्वामींचे एक गद्य पत्रही मूळ स्वरूपात या ग्रंथात मांडलेले आहे. त्यांचा सर्वात मोठा ग्रंथ दासबोध ,रामदासी पंथाचा हा ग्रंथ साहेबच .कोठे काही अडले तर त्याचा निर्णय या ग्रंथात काय सांगितले असेल त्याप्रमाणे करून घेतला पाहिजे. या ग्रंथात व्यवहारातील गोष्टी चातुर्याने सांगितले आहेत .
मागच्या महिन्यात श्रीमत् दासबोध बद्दल अतिशय छान विवेचन झाले असल्यामुळे त्या अनुषंगाने या पुस्तकातील हे प्रकरण वाचायला अजून छान वाटते.
तत्कालीन महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यक्रांती आणि घडामोडी होत असताना कोणत्याही साधुसंताने त्याबद्दल एक शब्द देखील काढला नाही पण रामदासांनी या गोष्टी कळकळीने आपल्या लोकांपुढे आणि देशातील देवतांपुढे मांडल्या हा प्रकार नक्कीच कौतुकास्पद आहे. दासबोधाशिवाय रामदासांच्या मनाच्या श्लोकाचाही यात उल्लेख आहे . रामदासांनी रचलेली रामायणाची सुंदर आणि युद्ध अशी दोन कांडे ही यात विस्तृतपणे मांडली गेली आहेत .
*अजिंक्य रजनीचर माजले ।देव कारागृहीं घातले ।
म्हणोनी वैकुंठीहून पातले । देव सोडवावया ।।
जिहीं त्रैलोक्य जिंकिले । त्यास मर्कटा हाती मारविलें ।
भुवनत्रय आनंदविले । दाशरथीने ।।*
हे रामदासांनी सांगितलेले रामायणाचे सार आहे.
याखेरीज रामदासांच्या चुटके या कविता प्रकाराबद्दल या ग्रंथात उल्लेख आहे. काम, क्रोध, लोभ, मत्सर, प्रपंच यत्न, आळस वगैरे वरती असे चुटके आहेत.
या पुढील प्रकरणात दास पंचायतन तसेच वेडाबाई सारख्या कवयित्री आणि त्यांच्या रचना, वामन पंडित, श्रीधर, मयूर पंडित आणि त्यानंतरचे अनेक मराठीत लिहिणाऱ्या लेखकांची यात नोंद दिसते.
*तत्वता अर्थ ठाई पडो ना पडो । सर्वास टीका आपली आवडो ।
हा भाव असे तरी झडो । जिव्हाची हे ।।*
असे म्हणून यथार्थ दीपिका हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिणारे वामन पंडित यांचाही यात उल्लेख आहे
मराठी भाषा ही किती समृद्ध आहे याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर हा ग्रंथ उभा करतो. महाराष्ट्रातील शाहिरी परंपरा तसेच गद्य लिखाण याबद्दलही या ग्रंथात सविस्तर नोंदी आहेत .राम जोशी, अनंत फंदी, प्रभाकर यांची कवने तत्कालीन इतिहासाच्या बद्दल अतिशय सुरेख वर्णन करतात.
हा ग्रंथ एका बैठकीत वाचणे अवघड आहे .एक अभ्यास म्हणून एकेक प्रकरण शांतपणे वाचून त्यातील रचनांचा आस्वाद घेणे मराठी अभ्यासकांना नक्कीच आवडेल.
पुस्तक परिचयाच्या शब्द मर्यादेमुळे सर्वच प्रकरणे ,कवी, लेखक ओव्या, श्लोक , कवने यांना न्याय देता आला नाही त्याबद्दल क्षमस्व . हा ग्रंथ जर वाचायचा असेल तर खालील सांकेतिक स्थळावरती याची प्रत उपलब्ध आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे एक अतिशय सुरेख सांकेतिक स्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे .त्यात या ग्रंथाचा एक दुर्मिळ ग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे.
https://archive.org/details/MaharashtraSaraswatBhaveWithSupplementFull
https://www.indianculture.gov.in/
धन्यवाद. परिचय कसा वाटला, जरुर कळवा
*सचिन केळकर ९८३३५६१४२१*